Jacqueline Fernandez | 200 कोटीचे खंडणी प्रकरण! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मुंबई विमानतळावर देशाबाहेर जाण्यापासून रोखले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez ) देशाबाहेर जाताना आज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) रोखण्यात आले. 200 कोटींच्या वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) नावाचा ईडीच्या (ED) आरोपत्रात समावेश आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली प्रकरणाचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या. यामध्ये आलिशान गाड्या, घोडे आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील तिहार तुरुंगातून (Tihar Jail) 200 कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारी (दि.4) आरोपपत्र (Charge sheet) दाखल केले होते.

 

याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग (Money laundering) अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपपत्रात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात या अभिनेत्रींच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनने जानेवारी 2021 पासून एकमेकांच्या संपर्कात आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुकेश याने जॅकलीनला 10 कोटींहून अधिक किंमतीची महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. यामध्ये दागिने, हिऱ्यांचे दागिने, क्रॉकरी, 4 पार्शियन मांजरी (एका मांजरीची किंमत 9 लाख) आणि 52 लाख रुपयांचा घोडा अशा महागड्या भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. तसेच सुकेशने जॅकलिनच्या भावंडांना देखील मोठी रक्कम पाठवली होती.

 

ईडीने जॅकलिनच्या (Jacqueline Fernandez) जवळच्या मित्रांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली होती. नोरा फतेहीला सुकेश याने बीएमडब्ल्यू कार (BMW car) आणि एक आयफोन भेट दिला होता. याची एकूण किंमत एक कोटी हून अधिक होती.

 

Web Title :- Jacqueline Fernandez | jacqueline fernandez stopped from leaving india over extortion case of 200 core

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 707 नवीन रुग्ण, ‘ओमायक्रॉन’च्या रूग्ण संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

DGP Sanjay Pandey | परमबीर सिंह हे व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत, DGP संजय पांडेंचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

दिलासादायक ! ESIC च्या दोन मोठ्या योजनांच्या अटीत शिथीलता, हजारो लोकांना होणार फायदा; जाणून घ्या

Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस

Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?