मोदी है तो मुमकीन है ; सोशल मीडियावर मोदींची वाहवा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामामधील हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायू दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद च्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २०० ते ३०० अतिरेकींना कंठस्नान घालण्यात आले. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जातोय. देशात सर्वत्र या हल्ल्याचे समर्थन करत कौतुक होत आहे. भारतीय सैन्यदलासह सरकारचेही कौतुक केले जात आहे.

सामान्य जनताही या हल्ल्यावर आपले मत व्यक्त करत आहे. त्यासाठी सोशल मीडिया हे त्यांच्यासाठी योग्य माध्यम आहे. त्यामुळे जनता ट्वीटरवर व्यक्त होत आहे. ट्विटरवर मोदी है तो मुमकीन है असा ट्रेंड होत आहे.

दरम्यान, लोकांनी हा हॅशटॅग वापरत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात सरकारचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी सैन्याचे कौतुक करत पाकिस्तानला शिव्या दिल्या आहेत.

https://twitter.com/GorakhPaswanBjp/status/1100308079424327680