मोदींच्या मर्जीतील सीबीआय अधिकाऱ्याची मल्ल्याला मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याविरुद्धची लूक-आूट नोटीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष मर्जीतील एक सीबीआय अधिकाऱ्याने कमकुवत केली आणि मल्ल्या यास देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. सीबीआयमधील या अधिकाऱ्याचे नाव ए. के. शर्मा असे असून ते गुजरात श्रेणीचे अधिकारी आहेत.

[amazon_link asins=’B00MIL0XVA,1592408990′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb5d4e79-b970-11e8-94a1-ebc3eef3c0a6′]

विजय मल्ल्या याच्याविरोधातील लूक-आऊट नोटीस कमकुवत करण्यामध्ये शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे शर्मा यांनीच हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली, असा आरोपही राहुल गांधी यांनी ट्वीटरद्वारे केला आहे. सीबीआयचे सहसंचालक ए. के. शर्मा यांनी मल्ल्याची लूक-आऊट नोटीस कमकुवत केली आणि त्याला पसार होण्यास मदत केली. शर्मा हे गुजरात श्रेणीचे अधिकारी असून ते मोदी यांच्या विशेष मर्जीतील आहेत. त्यांनीच नीरव आणि चोक्सी यांनाही मदत केली, अरेरे काय हा तपास, असे गांधी यांनी ट्वीट केले आहे.

पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, चार जिल्ह्यांत नव्वदीपार

बँकांचे कर्ज बुडविल्यानंतर मल्ल्या यास देशाबाहेर पसार होण्यास नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप गांधी आणि काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी यापुर्वीच केली आहे. मल्ल्या कसा पसार झाला त्याची चौकशी करा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.