सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या हाताला झटका देऊन मोक्का मधील आरोपीचे ‘सिनेस्टाईल’ पलायन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना ठाण्यात मंगळवारी सायंकाळी घडली. चोरी, दरोडा अशा अनेक गुन्ह्यामुळे मोक्का कारवाई झालेल्या आरोपीला तब्बल ३ पोलीस व सहायक पोलीस निरीक्षक असे बंदोबस्तात घेऊन जात होते. कारागृहापासून काही अंतर बाकी असताना तो आरोपी एपीआयच्या हाताला झटका देतो काय आणि पाठीमागून आलेल्या दुचाकीवरुन पळून जातो काय. ठाणे कारागृहाबाहेर पोलिसांना मामा बनविणारी ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

नरेश फगुनमल छाब्रिया (वय २९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) असे या आरोपीचे नाव आहे.
उल्हासनगरातील चोरी, दरोडा, तसेच मोक्कांतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यात छाब्रियावर गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक केल्यानंतर त्याला ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवले होते. सकाळी त्याला कारागृहातून काढून ठाणे विशेष मोका न्यायालात हजर केले गेले. तेथील सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेले जात होते.

सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवराम चव्हाण व तीन पोलीस कर्मचारी त्याला घेऊन जात होते. पायी जात असताना कारागृहापासून अवघे काही अंतर राहिले होते. किल्ला मारुती मंदिराजवळ ते आल्यानंतर त्यांच्या बाजूने एक मोटारसायकलस्वार आला. त्याला पाहून छाब्रिया याने चव्हाण यांच्या हाताला झटका दिला व त्या मोटारसायकलस्वाराच्या पाठीमागे बसून तो पळून गेला. हे दृश्य पोलीस हताशपणे पहात बसले. एखाद्या चित्रपटात शोभावी, अशी ही घटना होती.

या आरोपीने आपल्या साथीदाराबरोबर हा कट कधी रचला. तो कारागृहात होता तर त्याचा साथीदाराशी कसा संबंध आला. तो हा कट रचत असताना पोलीस नेमके काय करीत होते, असे अनेक प्रश्न या पलायनामुळे निर्माण झाले आहेत. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी दोन पथके तयार केली आहेत.

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी