सांगलीतील सचिन डोंगरे टोळीला ‘मोका’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहशत निर्माण करुन गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या विश्रामबाग येथील सचिन डोंगरे टोळीच्या अकरा सदस्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का लावण्यात आलेल्यामध्ये सचिन डोंगरे, प्रवीण बाबर, सुरेश शिंदे, सुशांत कदम, गोपाळ पुजारी, सागर महानुर, मारुती शिंदे, प्रशांत सुरगाडे, स्वप्नील कुंभार यांच्यासह अन्य दोन अज्ञातांचा समावेश आहे.

सचिन डोंगरे याचा जॉय ग्रुप आहे. यामधील सदस्य हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरी, शिवीगाळ करुन हाणामारी करणे, खून आदी असंख्य गुन्हे दाखल आहेत. २०११ पासून टोळीवर बारा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सांगली शहरातील विश्रामबाग, संजयनगर, मिरज येथे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि गांधीनगर येथे त्यांची दहशत आहे. मध्यंतरी शहरात महेश नाईक यांचा खून करण्यात आला होता. ग्रुपचा आतापर्यतचा पूर्वइतिहास पाहता पोलीस निरिक्षक अनिल तनपुरे यांनी जॉय ग्रुपमधील सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मंजूरी दिली.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर