डिलव्हरी बॉय चेन ‘ओपन’ ठेऊनच समोर गेला, त्यानं तरूणीच्या दोन्ही हातांना ‘स्पर्श’ केला, विनयभंगाचा FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- येरवडा परिसरात डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या एका डिलव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू देण्यासाठी तो आला होता.

याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज बाळासाहेब हेगडे (वय २७, रा. घोरपडी) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने मिंत्रा कंपनीकडून ऑनलाइन वस्तू खरेदी केली होती. त्या वस्तुची डिलीव्हरी देण्यासाठी आरोपी हा तरुणीच्या घरी शुक्रवारी सायंकाळी गेला होता. आरोपी घरी गेला त्यावेळी तरुणीने घरी एकटीच होती. त्यामुळे आरोपीने पॅन्टची चेन उघडून तरुणीसमोर गेला. तरुणीच्या दोन्ही हाताला स्पर्श केला. तरुणीने या सर्व प्रकारामुळे घाबरली. तिने आरडा-ओरडा केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. त्यानंतर येरवडा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार येरवडा पोलिसांनी डिलीव्हरी बॉयचा शोध घेऊन अटक केली. याप्रकरणी येरवडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/