SBI चा मोठा निर्णय ! 1 लाख रुपयांवरील रक्कमेवर मिळणार ‘एवढं’ व्याज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय स्टेट बँकेच्या बचत खात्यात यापुढे तुम्ही एका लाखाच्यावर रक्कम ठेवणार असाल तर दहावेळा विचार करा. कारण यापूढे बँक एक लाखाच्या वर रक्कम खात्यात असल्यास तुम्हाला 50 पैसे कमी व्याजदर देणार आहे. सध्या एसबीआय एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 3.50 टक्के व्याजदर देते. मात्र आता एक लाखाच्या पुढे रक्कम तुमच्या खात्यात असल्यास केवळ 3.00 टक्के वार्षिक व्याजदर मिळणार आहे.

एक सप्टेंबरपासून लागू झाले नवीन दर
एसबीआयच्या वेबसाईटवर यासंदर्भात सर्व माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही
https://sbi.co.in/portal/web/interest-rates/savings-bank-deposits  या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. यामध्ये सांगण्यात आले आहे कि, 1 लाख रुपयांच्या वर असणाऱ्या रकमेवर 3 टक्क्यांनीच व्याजदर दिले जाईल. त्याचबरोबर हे व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर आधारित असणार आहे. नुकतेच आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून हा दर 5.15 टक्के केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी