मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आजही मुसळधार, परतीचा पाऊस लांबणार !

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे आता नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस उशिरा दाखल झाल्यामुळे परतीचा पाऊस देखील लांबला आहे. आजदेखील हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यत वर्तवली असून पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

बुधवारी संध्याकाळी पुणे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातल्याने कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस लांबणार आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात आहे. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 12 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियामधील काही भागात ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, काल झालेल्या दमदार पावसामुळे राज ठाकरे यांची प्रचारसभा देखील रद्द करावी लागली होती. त्याचबरोबर कालच्या पावसाने पुण्यातील नागरिकांचे जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. तसेच अनेक वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like