रेकॉर्डब्रेक ‘कामगिरी’ ! महाबळेश्वरला 3 हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सर्वत्रच जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा भागात तर या वर्षी पावसाने सगळे रेकॉर्डच तोडलेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत मुंबईत सुमारे पाचशे मिलीमीटर एवढा अधिकचा पाऊस झाला आहे. महाबळेश्वर येथील वेधशाळेत शुक्रवारी ऑगस्ट महिन्यातील ३ हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून, अद्याप अर्धा ऑगस्ट शिल्लक आहे. ८ ते १४ ऑगस्टदरम्यानच्या आकडेवारीनुसार, उत्तर पश्चिम भारतात सर्वसाधारणरीत्या ४९.८ मिलीमीटर पावसाची नोंद होते. या वेळी ती ३८.८ मिमी एवढी झाली आहे.

मध्य भारतात सर्वसाधारणरीत्या ७२.६ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या वेळी तो १४७.५ मिमी झाला आहे. हा पाऊस १०३ टक्के एवढा अधिकचा पाऊस आहे. दक्षिण द्वीपकल्प भागात सर्वसाधारणरीत्या ४६.२ मिमी पाऊस पडतो. या वेळी ९६.८ मिमी पाऊस पडला असून, हा १०९ टक्के अधिकचा पाऊस आहे. पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात सर्वसाधारणपणे ८०.२ मिमी पाऊस पडतो. या वेळी तो ५५.४ मिमी पडला आहे. हा पाऊस ३१ टक्के उणे आहे.

कोकणातही चांगला पाऊस –
कोकण-गोवा, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात विभाग, पश्चिम मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थानमध्ये उत्तम पाऊस झाला आहे.

राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनसाठी हवामान अनुकूल –
ऑगस्ट महिन्यात संपूर्ण देशात सर्वसाधारणरीत्या ६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात मात्र अनुकूल हवामानामुळे या काळात पाऊस चांगला बरसला आहे. परिणामी, या कालावधीत ८९.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस ४५ टक्के एवढा अधिकचा पाऊस आहे.

महाराष्ट्र राज्यातील पश्चिम भागात पुराची परिस्थिती लक्षात घेता इतर राज्यांना जोडून असलेल्या धरणांमध्ये पाणीसाठी सोडण्यात आला आहे. हरित क्रांतीसाठी यावर्षी पोषक वातावरण असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –