संतापजनक ! जन्म देऊन आई पळाली, डॉक्टराने फेकले मंदिराजवळ

मच्छिलीपट्टनम (आंध्र प्रदेश) : एका नवजात बालकाला जन्म दिल्यानंतर आई पळून गेली तर खुद डॉक्टराने या मुलाला मंदिराजवळ फेकून दिल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी डॉक्टर व त्याच्याबरोबरच्या दाईला अटक केली आहे.

डॉ. श्रीनिवासाचार्य आणि एएनएम बेबी रानी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मच्छिलीपट्टनम येथील एका नर्सिग होममध्ये एका महिलेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर मुलाची आई मुलाला सोडून नर्सिंग होममधून पळून गेली. हे समजल्यानंतर नर्सिंग होममधील डॉ़ श्रीनिवासाचार्य आणि बेबी रानी यांनी या नवजात बालकाला श्री वेंकेटेश्वरस्वामी मंदिराजवळ फेकून दिले.

ही बाब स्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या बालकाला जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून त्याला विजयवाडा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यात या बालकाचा मृत्यु झाला. पोलिसांनी डॉक्टर आणि दाईला अटक केली आहे.