‘माता तू न वैरीण’ ! आईनं स्वतःच्या 3 मुलांना मारलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आईला देवाचे रूप मानले जाते, परंतु एक अशी घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या तीन मुलांचा खून केला आहे. मुले ओरडत होती पण आईला थोडाही पाझर फुटला नाही. तिने मुलांचा जीव घेतला.

ही घटना अमेरिकेच्या ओरिझोना राज्यातील आहे, जिथे एका महिलेने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि सांगितले की तिने आपल्या तीन मुलांना ठार मारले. मुले तरमळत होती परंतू त्या कठोर आईला काहीच वाटले नाही. विदेशी मीडियाच्या वृत्तानुसार या महिलेचे नाव हेनरी असून तिला ड्रग्सची सवय लागली आहे. तिने सर्व घटना स्वत: पोलिसांना सांगितली. एकामागून एक तिने आपल्या तीन मुलांना ठार मारले.

तिने मुलांचा गळा व नाक दाबून जीन घेतला. मुलांमध्ये सहा महिन्यांच्या बाल मुलीचाही समावेश आहे. हेनरीने प्रथम बाळाला बाटलीतून दूध पाजले आणि त्यानंतर तिने अंगाई गीत गात असताना तिचा गळा दाबला. हेनरीने सांगितले की, त्यानंतर तिने मृतदेह सोफ्यावर ठेवला. हेनरीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने लोक हैराण झाले आहेत. एका आईने तिच्या स्वत: च्या तीन मुलांची हत्या कशी काय केली याबद्दलही त्यांना आश्चर्य वाटत आहे.

हेनरीने घरातल्या इतर लोकांना सांगितले की, मुले झोपली आहेत. परंतु मुलांमध्ये कोणतीही हालचाल न झाल्याने घरातील लोकांनी आपत्कालीन नंबरवर कॉल केला आणि पोलिसांना सांगितले. या महिलेच्या घरात उपस्थित असलेल्या सदस्याने सांगितले की, तिला ड्रग्जची सवय लागली आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून ती विचित्र वागत होती. त्याचबरोबर त्यांनी तिन्ही निर्दोष मुलांविषयीही पोलिसांना सांगितले.

हेनरीने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने स्वत: संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली आहे. तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलांच्या हत्येमागील हेतू अद्याप कळू शकला नाही.

 

फेसबुक पेज लाईक करा –