तरुणीला पळून नेले नातवानं तर आजोबाला जिवंत जाळलं

भिंड/मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशामध्ये नातवाच्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या आजोबांना भोगावी लागल्याची घटना घडली आहे. ही घटना भींड जिल्ह्यातील अंदोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छरंटा गावात घडली आहे. या गावात 75 वर्षीय तुंडेलाल जाटव त्यांची पत्नी रामबेटी जाटव आणि नातू संजीव जाटव हे राहतात. 4 जून रोजी संजीवने प्रेमप्रकरणातून गावातील एका मुलीला पळवून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. शनिवारी रात्री तुंडेलाल जाटव आपल्या घराबाहेर असलेल्या पलंगावर झोपले असताना रात्री उशीरा त्यांना अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. रात्री दोन वाजता पत्नीने पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून घराबाहेर आली असता तिने पतीने पेट घेतल्याचे दिसले. त्याचवेळी दोन ते तीन जण पतीला पेटवून देत असल्याचे तिने पाहिले. पत्नीने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक जागे झाले.

एका व्यक्तीने भिंडातील भीमनगरमधील नातेवाईक सुनील कौशल यांना या घटनेबाबत माहिती दिली. सुनील यांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच अंदोरी पोलीस सकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी पोहचले. त्यांनी पीडित वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी गोहड येथे उपचारासाठी पाठवून दिले. गोहड रुग्णालयात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने वृद्ध व्यक्तीला ग्वाल्हेर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

वृयोवृद्ध रामबेटी जटाव यांचे म्हणणे आहे की, नातू 4 जूनपासून बेपत्ता आहे. शनिवारी सकाळी पोलीस आले. त्यांच्यासोबत आलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी धमकी दिली होती की, संध्याकाळपर्यंत त्या दोघांना पोलीस ठाण्यात पाठवले नाही तर रात्री परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा अशी धमकी दिली.

भिंड येथील ठाणे अंदोरीचे प्रभारी अधिकारी बृजमोहन भदौरिया म्हणाले की, पोलीस ठाण्यातून कोणताही पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेला नाही हा आरोप चुकीचा आहे. पीडित वृद्ध व्यक्तीला पुढील उपचारासाठी तात्काळ ग्वाल्हेर येथे पाठवण्यात आले आहे. तक्रार यासाठी नोंदवण्यात आली की, पीडित वृद्ध व्यक्तीचा अद्याप जबाब घेण्यात आला नसून त्यांचा जबाब घेण्यासाठी एक पथक ग्वाल्हेर येथे रवाना करण्यात आले आहे.