MP Dr. Amol Kolhe | पुणे जिल्ह्याची विभागणी व नवीन शिवनेरी नावावर खा. अमोल कोल्हे स्पष्टच बोलले !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे जिल्ह्याचे विभाजन व्हावे व नवीन शिवनेरी जिल्हा (Shivneri District) बनवावा अशी मागणी आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली होती. यावरून आता नवे राजकारण रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी या पुणे जिल्ह्याच्या विभागणी वरून लांडगे यांना टोला लगावला आहे. नवीन शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनावर काही फरक पडणार आहे का? की ही एक केवळ राजकीय मागणी आहे? असा सवाल खा. कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे.

 

महेश लांडगे यांच्या या पुणे जिल्ह्याच्या (Pune District) विभागणीच्या मुद्द्यावरून सर्वत्र खळबळ उडाली. खा. अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, जिल्ह्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला जावा. शिवनेरी नावाला आमचा कोणताही विरोध नाही फक्त मागणीमागची व्यवहार्यता तपासायला हवी. तसेच शिवरायांनी केलेले काम या सगळ्यांनी पहिलं पाहिजे. शिवरायाचं तत्व हे लोककल्याणकारी राज्य बसवण्याचं होतं. जिल्ह्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्या, असा खोचक टोला त्यांनी लांडगेंना लगावला आहे.

जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना खा. कोल्हे म्हणाले की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik Semi High Speed Railway) हा लोककल्याणकारी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे जुन्नर (Junnar) ते पुण्याचा प्रवास काही मिनिटांचा होऊ शकेल. हा रेल्वे मार्ग देशातील एकमेव ब्रॉडगेजवर (Broadgauge) होऊ शकणारा प्रकल्प आहे. यामुळे याचा लोकांवर फार फरक पडणार असल्याचं ते म्हणाले. त्याबरोबर इंद्रायणी मेडिसीटीची (Indrayani Medicity) सारखी मागणी आहे. देशात असा प्रकल्प आतापर्यंत कोणत्याही शहरात झाला नाही आहे. त्यामुळे आरोग्याच्या सुविधांबाबत विचार करायला हवा. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री असताना दोन्ही प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली होती. मात्र त्यांनतर सरकार बदललं आणि हे सरकार यांसारख्या प्रकल्पावर काम करताना दिसत नाही आहेत. मात्र याच प्रकल्पामुळे मोठा विकास होणार आहे आणि अनेक लोकांना याचा फायदादेखील होणार आहे, फक्त शिवनेरी नाव ठेऊन काही होणार नाही असे मत खासदार अमोल कोल्हे (MP Dr. Amol Kolhe) यांनी मांडले आहे.

 

Web Title :  MP Dr. Amol Kolhe | mp amol kolhe reaction on new pune district
divide and create new district named shivneri mahesh landge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा