MP Girish Bapat | ‘राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी करत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले होते. दरम्यान यावरून भाजपचे खासदार गिरीश बापट MP Girish Bapat यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. दादा, शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होतं. पण आता त्यांचे (अजित पवार) कार्यकर्तेही ऐकत नाही हे माहिती झाले आहे. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक अशा शब्दात टोला लगावला आहे. तसेच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत आमच प्राधान्य राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नसल्याचे खासदार बापट यांनी म्हटले आहे

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्याना लिहलेल्या पत्रात युती तोडल्याने माझ्यासारख्या नेत्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो, हे पत्रात नमूद करून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर दोषारोपण केले आहेच. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची कामे होत असून ते शिवसेनेला फोडत असल्याचा आरोपही केला आहे. दरम्या याबाबत खासदार बापटांना विचारले असता ते म्हणाले, भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया आहे. भविष्यात काळात अशा गोष्टी होऊ शकतात, असे ते म्हणाले. दरम्यान, सरनाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा सल्लाही या पत्रातून दिला आहे. याबाबत बोलताना बापट यांनी अनैसर्गिक लोकांमूळे आमची तुटली होती, भविष्यात युती होऊ शकते, आम्हाला त्याचा आनंद आहे. सरनाईक आता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होताना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचा असल्याचे बापट म्हणाले. .

भाजप नाही, तपास यंत्रणा कारवाई करतातः खासदार बापट
आतापर्यंत अनेक नेत्यांना ईडीच्या चौकशींना सामोरे जावे लागते.
त्यावरुन भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत विचारले असता, कोणतीही कारवाई भाजप करत नाही.
तपास यंत्रणा त्या कारवाई करतात, असे सांगून बापट यांनी हे आरोप नाकारले.
तसेच भाजप गरीब पार्टी आहे, ती कारवाई नाही तर, लोकांना मदत करणारी पार्टी असे
स्पष्टीकरणही खासदार बापट यांनी यावेळी केले.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : MP Girish Bapat | ncp is a small party in western maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update