MP Sanjay Raut | आम्हाला आलेलं निमंत्रण लग्नाचं-बारशाचं की भाजपच्या निरोप समारंभाचे?, संजय राऊतांचा तिरकस सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने (Central Government) पाच दिवसांचे विशेष अधिवेशन (Special Session) बोलावले आहे. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने आम्हाला विशेष अधिवेशनाचं निमंत्रण दिलं आहे. परंतु या अधिवेशनात नेमकं काय होणार आहे. कोणत्याही कार्यक्रमाशिवाय असं अधिवेशन बोलवण्यात आलंय अस सांगतानाच आम्हाला आलेलं निमंत्रण हे लग्नाचं-बारशाचं- वाढदिवसाचं की भाजपच्या (BJP) निरोप समारंभाचे आहे? असा तिरकस सवाल संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

भारत नावावरून भाजपला सुनावले

राष्ट्रपतींच्या राजपत्रातून (President’s Gazette) ‘इंडिया’ (India) हा शब्द गायब होऊन ‘भारत’ (Bharat) असा उल्लेख करण्यात आल्याने विविध चर्चा होत आहे. यावरुन संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली आहे. आम्ही इंडिया नाव दिल्याने देशाच्या नावाची भीती वाटते, तुम्ही काय काय बदलणार आहात? भारत हाच इंडिया आहे. संविधान (Constitution) बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्हाला नवीन भारत बनवायचा आहे तर रिपब्लिक ऑफ भारत (Republic of Bharat) करा, तुम्ही चंद्रयानात बसून काम करताय का? इंडिया आहे, इंडिया राहील आणि सत्तेवर इंडिया येईल असा दावा करत संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

आघाडीचं नाव ‘इंडिया’ ठेवल्यापासून…

जेव्हापासून विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे तेव्हापासून त्यांना असुरक्षितता वाटू लागली आहे. तसेच जुडेगा भारत जीतेगा इंडिया अशी आमची टॅगलाईन असल्याने विरोधी पक्षांची गोची झाली आहे. आमच्या नावाच इंडिया आणि भारत असे देन्ही आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा पोटशूळ उठला आहे. असा कोणता राज्यकर्ता असेल जो देशाच्या नावालाच घारबत असेल?असा सवाल करताच अताा सत्ताधाऱ्यांची निरोपाची तयारी करावी, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

राऊतांची सरकारकडे मागणी

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना विरोधकांच्या बैठकीचे अधिकार दिले आहेत.
सोनिया गांधी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत.
देशातील खासदारांना एकत्रित का बोलवताय हे कळू द्या, ही कोणती हुकुमशाही आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा विषय सांगितला नाही ही कोणती गोपनीयता आहे.
तुम्ही कार्यक्रम कशाला लपवत आहात? तुम्ही संसदेच्या अधिवेशनाचा अजेंडा सांगितला नाही. आम्हाला अधिवेशनात काही प्रश्न मांडायचे आहेत ते मांडू शकतो की नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. आम्हाला त्यावर आवाज उठवायचा आहे. राज्यात दुष्काळ आहे ते प्रश्न मांडू शकतो की नाही हे सरकारने सांगावे अशी मागणी संजय राऊतांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

06 September Rashifal : मिथुन, कन्या आणि तुळसह २ राशीच्या जातकांना मिळू शकते शुभवार्ता, वाचा दैनिक भविष्य

Pune Crime News | बिबवेवाडी: पार्सल घेताना धक्का लागल्यानंतर अल्पवयीन युवकांकडून तरूणावर खुनी हल्ला

Side Effects Of Turmeric Milk | या ५ लोकाना त्रासदायक ठरते Curcumin, चुकूनही पिऊ नका हळदीचे दूध