MP Supriya Sule | मोफत तिकिटासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची धमकी ! अमोल कोल्हेंबरोबर घडलेल्या प्रकाराबाबत सुप्रिया सुळेंची नाराजी; म्हणाल्या – ‘खासदारांना अशी वागणूक तर…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजी महाराजांवरील (Chhatrapati Sambhaji Maharaj) महानाट्याचे मोफत तिकीट (Free Ticket) दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr.Amol Kolhe) यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) दलातील काही पोलिसांवर केला आहे. कोल्हेंच्या आरोपानंतर आता विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी यासंदर्भात तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी असल्याचे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास ‘शिवपुत्र संभाजी’ (Shivputra Sambhaji Mahanaty) या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी चिंचवड येथील प्रयोगाच्या दरम्यान या महानाट्याच्या फुकट प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले.

खासदार असणाऱ्या डॉ. कोल्हे यांना अशा पद्धतीने धमकी दिली जाते ही अतिशय गंभीर बाब आहे. खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची तातडीने याची दखल घेऊन पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.

 

 

काय म्हणाले अमोल कोल्हे?

खासदार अमोल कोल्हे यांना शनिवारी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
यामध्ये त्यांनी मोफत तिकीटासाठी पोलिसांकडून धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचे नाव सांगणार नाही.
कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकीट मागण्याची आहे.
अगदी शेवटी 300 रुपयांचे तिकीट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास
दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो, असे कोल्हे म्हणाले होते.

 

Web Title :- MP Supriya Sule | Baramati NCP MP supriya-sule-reaction-after-amol-kolhe-allegation-on-pimpari-chinchwad-police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

 

Maharashtra Politics News | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘पहाटेचा शपथविधी…’

Pune Crime News – Lonikand Police Station | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – वाघोलीत संगणक अभियंता तरुणाचा खून