आगामी निवडणुकीसाठी उदयनराजेंचे विराेधकांना ‘अाेपन चॅलेंज’

मुंबई: वृत्तसंस्था

‘अनेक जण म्हणाले उदयनराजे नको कुणीही चालेल, अगदी मला आडवं करायचं चाललंय. कोण कुणाला आडवं करतं बघू ‘असं म्हणत  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. तसंच  ‘कुणाला वाटत असेल की मी उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन’ अशा शब्दांत जाहीर आव्हानच उदयनराजेंनी केलं.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’66110484-cbcf-11e8-8740-73f1bdd9164a’]

आज मुंबईत उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर ‘कामानिमित्त मी मंत्रालयात येत असतो. मी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या भेटी घेत असल्याचं’ उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं. राजे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असून साताऱ्यात त्यांना पक्षातूनही विरोध होतोय. त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जातेय.
[amazon_link asins=’B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43e1fda4-cbd0-11e8-bd6c-17bc4c606a4f’]

आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, “लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते, माझा त्याला विरोध नाही. लोकांचा पाठिंबा याला मी खासदार पदापेक्षा जास्त महत्त्व देतो.” काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीवादीतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उदयनराजेंनी स्पष्ट केलं होतं की, “साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. मात्र पवारसाहेब अंतिम निर्णय घेतील. मला विरोध झाला तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. अनेकांचा मला पाठिंबा आहे, अशी कोपरखळी उदयनराजेंनी लगावली होती.”
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6ba71219-cbcf-11e8-aa59-3d175dd03cfb’]
“आज विविध कामांच्या उद्घाटनानिमित्त आणि भूमिपूजनानिमित्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मतदार संघातील कामांबाबतही चर्चा झाली. आजचे मंत्री आमदार नसल्यापासूनचे माझे मित्र आहेत”, असं उदयनराजे म्हणाले. “पवार साहेबांनी मतदार संघाचा आढावा घेतला आहे. साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जसे पवार साहेबांचे अन्य पक्षात मित्र आहेत, तसेच अन्य पक्षातही माझे मित्र आहेत”, असं सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केलं होतं.