MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रात सहा ठिकाणी परीक्षा केंद्र, फॉर्म भरायला फक्त १५ दिवस

पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला. ही परीक्षा 29 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आली होती. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा (MPSC Pre 2022) 2022 चा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) जाहीर करण्यात आला. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस (MPSC mains 2022) अर्ज भरण्यासाठी 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यानचा कालावधी दिला आहे आणि उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची कटऑफ (Cut-off List) यादी आयोगाच्या (MPSC) https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ही मुख्य परीक्षा अमरावती (Amaravati), नाशिक (Nashik), पुणे (Pune), मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad) या सहा केंद्रांवर 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

 

पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी कळवण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे आवश्यक आहे.
अन्यथा त्या उमेदवाराला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र मानले जाणार नाही.
तसेच, पूर्व परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे ही आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- MPSC | mpsc exam state services main exam update know all details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | “प्रत्येकाने तुरुंगात जाण्याचे टाळले पाहिजे…” संजय राऊतांना आली प्रचिती

Maharashtra Politics | शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का, 13 वा खासदार शिंदे गटात सामील

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणात केतकी चितळेची उडी, आणखी ‘ही’ कलमं वाढवा अन्यथा…