Lockdown : निवृत्ती घेण्याच्या तयारीत MS धोनी ? पत्नी साक्षीनं दिलं उत्तर

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – बुधवारी सोशल मीडियावरती #DhoniRetires हा ट्रेंड करण्यात आला. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जुलै २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बऱ्याच दिवसांपासून थांबलेल्या या चर्चा काल अचानक पुन्हा सुरु झाल्या. मात्र, या सगळ्यावरती धोनीची पत्नी साक्षी चांगलीच भडकली.

धोनीच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल अजून देखील स्पष्टता नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो आंतराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पुनरागमन करेल असं वाटत होत. मात्र, आयपीएलवर देखील कोरोना संसर्गाचे सावट आहे. त्याचं पार्श्वभूमीवर बुधवारी अचानक ट्विटरवरती #DhoniRetires हा ट्रेंड व्हायरल झाला. त्यावरती साक्षीनं ट्विट करत म्हटलं की, “या अफवा आहेत. लॉकडाऊन मुळे लोकांच मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे मी समजू शकते.” अशा शब्दांमध्ये तिनं सर्वाना फटकारलं. मात्र, काही वेळानंतर साक्षीनं हे ट्विट डिलीट केलं.

दरम्यान, सुनील गावस्कर यांनी धोनीनं ऑस्ट्रोलियात होणार टी-20 वर्ल्ड कप खेळावा अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, आता कोरोना संसर्गामुळे ही स्पर्धा २०२२ पर्यंत पुढं ढकलण्यात येणार असल्याच समजत आहे. त्यामुळे आता धोनीकडे आयपीएल हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. आयपीएल ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआयची धडपड सुरु असली तरी लॉकडाऊन नंतर प्रेक्षकांशिवाय ती आयोजित करण्यात येऊ शकते.