थॅक्यू धोनी ! निवृत्तीवर अनुष्का शर्माची पोस्ट

पोलिसनामा ऑनलाईन – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एम.एस. धोनीच्या निवृत्तीचीच चर्चा रंगली आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे. इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने धोनीचे आभार मानले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अनुष्काच्या पोस्टची चर्चा होत आहे.

कधीही न विसरता येणार्‍या आठवणी दिल्यामुळे मनापासून धन्यवाद एम.एस. धोनी, अशी पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे. सोबतच तिने धोनीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे, अनुष्काप्रमाणेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धोनीप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केले आहे. जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीचं नाव घेतले जाते. धोनीच्या नेतृत्वात 2007 मध्ये भारताने टी 20 चा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2011 चा एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवरे नाव कोरणारा धोनी एकमेव कर्णधार आहे.