ताज्या बातम्यापुणे

MSEDCL | राज्यावर वीज संकट? गुजरातची कंपनी म्हणते आधी 120 कोटींची थकबाकी द्या तरच वीज देऊ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MSEDCL | राज्यावर वीज कपातीचे (Electricity Load Shedding) संकट ओढवले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रीमंडळाने गुजरातमधील (Gujarat) टाटांच्या कंपनीकडून (सीजीपीएल) ७६० मेगावॅट वीज खरेदीचा निर्णय घेतला. मात्र कंपनीने आधी १२० कोटींची थकबाकी द्या मगच वीज देऊ असे पत्र दिल्याने महावितरणची चिंता वाढली आहे. दरम्यान, महावितरणने (MSEDCL) तोडगा निघाला असल्याचा दावा केला असला तरी सोमवारी रात्री पर्यंत सीजीपीएलकडून (CGPL) वीज पुरवठा केला जाईल असा कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे समोर आले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यावर वीज कपातीचे संकट ओढवले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी ८ एप्रिलला मंत्रिमंडळाची विशेष बैठक (Special Cabinet Meeting) झाली. त्यामध्ये खासगी कंपनीकडून वीज खरेदीस मान्यता देण्यात आली. त्यानंतर लगेचच गुजरातच्या सीजीपीएलकडून ७६० मेगावॅट वीज खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले. त्यानुसार गेल्या चार दिवसापासून महावितरण (MSEDCL) आणि सीजीपीएलच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सीजीपीएलने आधी १२० कोटींची थकबाकी द्या मगच वीज देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महावितरणची चिंता वाढली आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यात आला असल्याचा दावा महावितरणने केला आहे. मात्र, वीजपुरवठा करण्यात येईल असे कोणतेही पत्र सीजीपीएलकडून देण्यात आले नाही. परंतु, महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री पासून सीजीपीएल वीज पुरवठा सुरू करणार आहे.

 

…तरी लोडशेडिंगची शक्यता कायम

सीजीपीएलकडून ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यात येणार आहे मात्र तरीही २५०० मेगावॅटची तूट कायम राहणार आहे.
त्यामुळे राज्यात भारनियमन राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या २८ हजार मेगावॅटहून अधिक मागणी आहे. त्यात २५०० ते तीन हजार मेगावॅटचा तुटवडा आहे.
त्यामुळे येत्या १५ दिवसात किमान ५०० ते ७०० मेगावॅटने वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MSEDCL | give 120 crores first then you will get electricity gujarat company blow to msedcl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button