मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे चिरंजीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला हजेरी लावली. त्यामुळे मुकेश अंबानी यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे की, भाजपा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेसमधील एमएमआरडीएच्या मैदानावर सभा झाली. या सभेत मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आपल्या मित्रांसोबत दिसून आला. त्यामुळे वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांचा पाठिंबा नक्की पाठिंबा नक्की काँग्रेसला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यावर तर्कवितर्क सुरु झाले आहेत.

मुकेश अंबानी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मिलिंद देवरा हेच दक्षिण मुंबईसाठी योग्य प्रतिनिधी आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे १० वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. मला विश्वास आहे की, मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जाण आहे.

आता मोदींच्या सभेला अंबानीचे चिरंजीव उपस्थित राहून त्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाऊ लागले आहे.