Multibagger Stock | 15 रुपयांचा शेयर झाला 533 रुपयांचा, 1 लाखाचे केले 35.55 लाख रुपये, जाणून घ्या काय करते कंपनी?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | तुम्ही देखील मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये गुंतवणूक (Investment In Multibagger Stock) करण्याचा विचार करत आहात का ? तर आम्ही तुम्हाला एका जबरदस्त स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने शेअरहोल्डर्सला खूप पैसे कमावून दिले आहेत. बासमती तांदळाचा उद्योग करणार्‍या या कंपनीची कोरोना काळापासून चांगली कामगिरी सुरू आहे. GRM Overseas असे या स्टॉकचे नाव आहे. या शेयरने केवळ तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3,455 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

 

14.99 रुपयांवरून 532.95 रुपयांवर पोहोचली किंमत
हा स्मॉल कॅप स्टॉक 21 फेब्रुवारी 2019 रोजी बीएसईवर 14.99 रुपयांवर बंद झाला होता आणि काल 22 फेब्रुवारीला तो 532.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. त्यामुळे तीन वर्षांत गुंतवणूकदार मालामाल झाले. तीन वर्षांपूर्वी जीआरएम ओव्हरसीजच्या शेअर्समध्ये गुंतवलेले 1 लाख रुपये आज 35.55 लाख रुपये झाले असते. (Share Market Marathi News)

मात्र, काल हा शेअर 4.99% च्या घसरणीसह 532.95 रुपयांवर उघडला. तेव्हापासून संपूर्ण सत्रात स्टॉक 5% लोअर सर्किटमध्ये अडकला होता. गेल्या 4 दिवसात स्टॉकमध्ये 18% घसरण झाली आहे. (Multibagger Stock)

 

यंदाची आतापर्यंतची कामगिरी
जीआरएम ओव्हरसीजचे शेअर्स 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्त पण 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा कमी आहेत. एका वर्षात स्टॉक 837.26% वाढला आहे परंतु या वर्षाच्या सुरूवातीपासून 16.53% घसरला आहे. एका महिन्यात शेयरमध्ये 38.39 टक्के आणि एका आठवड्यात 17.94 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

BSE वर या फर्मचे मार्केट कॅप 3,197 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत, तीन प्रमोटर्सकडे फर्ममध्ये 72 टक्के भागीदारी होती आणि 12,793 सार्वजनिक भागधारकांकडे 28 टक्के हिस्सा होता. यापैकी 12,511 सार्वजनिक भागधारकांकडे 2 लाख रुपयांपर्यंत भांडवलासह 8.52% हिस्सा होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत दोन परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) 21,635 शेयर घेतले आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती
डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला नफा झाला.
कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5.92 कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 350% वाढीसह 26.66 कोटी रुपयांची माहिती दिली.
डिसेंबर 2020 तिमाहीत विक्री 39% वाढून 296.83 कोटी झाली आहे.
जी 2020 च्या डिसेंबर तिमाहित 213.47 कोटी रुपये होती.
डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा 100% वाढून रु. 23.24 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 11.57 कोटी होता.

 

कंपनीचा व्यवसाय काय आहे ?
GRM Overseas ही भारतीय कंपनी तांदूळ निर्मिती आणि व्यापारात गुंतलेली आहे.
कंपनी जगभरातील ग्राहकांसाठी तांदळाच्या विविध जातींचे उत्पादन करते.
पारंपारिक बासमती तांदूळ, सुपर बासमती तांदूळ, इंडियन 1121 सुपर राईस, इंडियन लाँग ग्रेन राईस, शरबती तांदूळ आणि सुगंधा तांदूळ यांचा समावेश आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | basmati rice manufacturing company delivered 3455 return in 3 year investors 1 lakh turn to 35 lakh rupee

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा