2 लाखाच्या लाच प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एम.पी.डी.ए.ची कारवाई न करण्यासाठी 2 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करणारे जे.जे. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याविरूध्द मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्याविरूध्द 2 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

तत्कालीन पोलस आयुक्‍त आणि सध्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल लाच प्रकरणी कारवाई झालेल्या संबंधित पोलिसांना थेट बडतर्फ केले होते. त्यामुळे या पोलिस निरीक्षकावर काय कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरीष मुरलीधर गायकवाड असे लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. जे.जे. मार्ग पोलिसांकडून तक्रारदार यांच्याविरूध्द एम.पी.डी.ए. ची कारवाई होणार होती. ती टाळण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष गायकवाड यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रारी दिली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये वरिष्ठ निरीक्षक गायकवाड हे 2 लाख रूपयाची लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसेवकाकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरूध्दच 2 लाखाच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे
केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय
रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल