मुंबईत चिमुरड्याच्या अंगावरून 2 वेळा गेली कार, तरीही वाचला जीव

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील मालाडमध्ये रस्त्यावर खेळणार्‍या चिमुकला पळताना समोरून येणार्‍या कार चालकाने त्याला चिरडून पुढे गेला. भरधाव कारचे टायर त्याच्या अंगावरून गेले. या घटनेमध्ये चिमुकला जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले.

पश्चिम उपनगर मालाडच्या पश्चिमेला मालवणी परिसरात म्हाडा कॉलनी इथे हा थरारक प्रकार घडला. रस्त्यावर खेळत असणार्‍या चिमुकल्याच्या अंगावर भरधाव कार गेली. घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 3 वर्षांच्या चिमुकला रस्त्यावर खेळत असताना अचानक मागून कार आली. अंगावर कार येत असल्याचं पाहून चिमुकला गोंधळून गेला. भरधाव कारचे टायर त्याच्या अंगावरून गेले. या घटनेमध्ये चिमुकला जखमी झाला. दैव बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे प्राण वाचले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीसीटीव्ही व्हिडीओनुसार कार चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.