VIDEO : उर्मिला मातोंडकरच्या रॅलीदरम्यान प्रचंड गोंधळ ; पोलिस संरक्षणाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर मुंबईल लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीत गोधळ झाल्याची घटना घडली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी भाजपने रॅलीत गुंड घुसवल्याचा आरोप करत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

उर्मिल मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. आज सकाळी उर्मिला मातोंडकर या पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्थानकाबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या रॅलीत ‘मोदी..मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात झाल्याने गोधळ झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काही वेळाने हा वाद निवळला. दरम्यान उर्मिला यांनी गोंधळ घालण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे सांगत भाजपने रॅलीत गुंड घुसवल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकाराबद्दल त्यांनी बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

भाजपने आरोप फेटाळले
दरम्यान या सर्व प्रकारावर मुंबई भाजपा अध्यक्ष विनोद शेलार यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की , ‘उर्मिला मातोंडकर यांना पराभव दिसू लागल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करत आहेत. २०१४ साली गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा दारुण पराभव केला होता. आता त्यांचा यापेक्षा जास्त मतांनी पराभव होणार असल्याने त्या बिनबुडाचे आरोप करत आहे.’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us