मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे हे 10 मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४० झाली असून, त्यामध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे व एका रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. मात्र सरकार अद्याप बस किंवा रेल्वे बंद करण्याच्या विचारात नसून, गर्दी कमी नाही झाली तर लोकल बंद करावी लागणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिदेतील काही ठळक मुद्दे –
१. गरज असेल तरच प्रवास करा.

२. सरकारी कार्यालयात ५० टक्के कर्मचारी ठेवण्याचा विचार.

३. कमी उपस्थितत कामकाज करण्याबाबत लवकरच निर्णय.

४. मुंबई सह इतर दुकानदारांना आवाहन करण्यात आलं आहे की दुकान बंद ठेवावी.

५. कठोर पावलं उचलण्याची आमची इच्छा नाही.

६. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवडाभर सुट्टी नाही.

७. गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊले उचलली जात आहे.

८. पुढचे १५ दिवस खूप महत्वाचे.

९. भविष्यात काही कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात.

१०. लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये १७ मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुंबई मध्ये कोरोनाचा प्रसार होऊन न देण्यासाठी लोकलची गर्दी कमी होणं महत्वाचं आहे. त्यामुळे लोकल आणि मेट्रो बंदीच्या निर्णयाकडे अनेकांचं लक्ष होत.

महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाउन नाही –
महाराष्ट्र्र सरकारने राज्यातील शाळा-महाविद्यालयांसोबत व्यायामशाळा,स्विमिंग पूल, सिनेमागृह,नाट्यगृह शॉपिंग मॉल्स, ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र संपूर्ण लॉक डाउन केल्यास नागरिकांना आपल्या परिसरातून दुसरीकडे जाता नाही येणार. सध्या चिंनांतर इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाउन लागू करण्यात आलं आहे. जर्मनी आणि फ्रान्स नेही संपूर्ण लॉक डाउन घोषित केलं.

लॉकडाउन मध्ये नागरिकांना केवळ ऍन आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा असते.

बस ,ट्रेन,हॉटेल,रेस्टोरंट,आणि रुग्णालयं वगळता सार्वजनिक सेवा बंद करण्यात येतात. संचारबंदी ओढवते.