Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणावरून (Mumbai Cruise Drug Case) सध्या राज्यातील वातावरण गरम आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे रोज वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान समीर वानखेडेंच्या कारवाईचे भाजपने (BJP) समर्थन केले आहे. त्यातच आता वानखेडेंच्या (Mumbai Cruise Drug Case) समर्थनार्थ मनसेही (MNS) पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर (wankhede stadium) लिटील मास्टर सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम पार पडला होता. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS sandeep deshpande) आणि अमेय खोपकर (MNS amay khopkar) यांनी त्या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे सूचक ट्विट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील मनसेने आपली भूमिका दोनच शब्दातच स्पष्ट केली असल्याचे बोलले जात आहे.

समीर वानखेडे आणि त्यांची बहिण यास्मिन वानखेडे (yasmin wankhede) यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप सुरु केले आहेत.
यास्मिन वानखेडे या मनसेच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे आरोपाला सुरूवात झाल्यानंतर मनसेने त्यांच्या बचाव केला होता.
त्यावेळी मनसे नेते अमेय खोपकर यांनी यास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा अभिमान आहे,
असे म्हंटले होते. तदनंतर वानखेडेंबाबत मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वातावरण (Mumbai Cruise Drug Case) तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Web Title :- Mumbai Cruise Drug Case | mumbai cruise drug case mns support sameer wankhede indicative hints mns leaders two word tweet upon wankhede stadium

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘जाऊ’बाईनं विवाहितेच्या मोबाईलवरुन मेसेज करुन ‘दीरा’च्या मनात निर्माण केला संशय; जाणून घ्या प्रकरण

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

Earn Money | जर तुमच्याकडे असेल हे 5 रुपयांचे नाणे तर असे मिळतील 5 लाख रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

Pune Crime | सरबतातून गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पुण्याच्या धनकवडी परिसरातील घटना