धक्कादायक ! राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने मनसे कार्यकर्त्यानं केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर तणावात येत एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काल या कार्यकर्त्याने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. प्रवीण चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या जवळचा व्यक्ती असल्याची माहिती मिळत आहे.

या तरुणाने आत्महत्या करताना एक चिट्ठी लिहिली असून यामध्ये त्याने आपल्या आत्महत्या करण्याच्या कारणांचा उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावली असल्याने मी दुखी झालो असून यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. प्रवीणच्या मित्रांनी या संबंधित माहिती दिली असून हि घटना घडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ त्याच्या घरी धाव घेतली आहे. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून हा कार्यकर्ता राज ठाकरेंचा मोठा चाहता असून त्याने याआधी देखील त्यांच्या समर्थनार्थ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात पोस्ट लिहिल्या तसेच केल्या आहेत. त्यामध्ये त्याने ईडीविरोधात अनेक अपशब्द वापरले आहेत.

राज ठाकरेंना ईडीविरोधात
कोहिनुर स्क्वेअरमध्ये राज ठाकरे यांनी भागीदारी घेताना कथित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून यामध्ये कोहिनूर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना देखील ईडीने नोटीस बजावली आहे. त्यानुसार काल उन्मेष जोशी हे ईडी समोर हजर झाले होते. त्यानंतर राज ठाकरे हे 22 ऑगस्ट रोजी ईडी च्या तपासाला सामोरे जाणार आहेत.

त्यानंतर राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईत भाजपविरोधी पोस्टर लावले आहेत. त्याचबरोबर ठाणे बंदचे देखील त्यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी हा बंद मागे घेतला असून पोलिसांनी देखील कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like