चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ अग्नितांडव

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईच्या चेंबुर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली असून परिसरातील बाजारपेठेत मोठा अग्नितांडव घडला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात धुराळे मोठ्या प्रमाणात लोळ दिसून आले. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोठ्या बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून कोणीही अडकलेल्याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जनता बाजारपेठेतील एका झेरॉक्सच्या दुकानाला आग लागली. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण करत आजूबाजूची तीन दुकानेही भक्ष्यस्थानी केली. आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे. आधी झेरॉक्स च्या दुकानाला लागलेली आग पसरत बाजूच्या 4 दुकानापर्यंत पोहचली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत 4 ते 5 दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनता मार्केटमध्ये जवळपास 100 च्या आसपास झेरोझ, स्टेशनरीची दुकान आहेत .