प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढाई झाली. शिवसेनेने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला. सावंत यांनी देवरा यांचा ९९ हजार १६८ एवढ्या मताधिक्यांनी पराभव केला. अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेच्या लढाईत सावंत यांनी बाजी मारली. ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अधिकृत साईटवरील आहे. यामध्ये किंचीत फरक पडू शकतो.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघामध्ये १४ लाख ४० हजार १४२ मतदार संख्या असून ७ लाख ९५ हजार ३९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघामध्ये ५५.२३ टक्के मतदान झाले. मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दिला होता.

उमेदवार पार्टी मिळालेली मतं
अरविंद सावंत शिवसेना ४२०५३०
मिलिंद देवरा काँग्रेस ३२१३६२
अनिल कुमार वंचित बहूजन आघाडी ३०२१३