Mumbai Police | ‘आम्ही ड्युटीवर आहोत’, म्हणत मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी; तुफान पावसात जखमी बाप-लेकिला सुरक्षित स्थळी हलवलं (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबईसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rainfall in mumbai) पडत आहे. रविवारी दुपारी थोडीशी उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाने बरसण्यास सुरुवात केली होती. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याच्या घटना घडल्या. मात्र, अशा परिस्थितीतही मुंबई पोलीस (Mumbai Police) आपले कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) कर्तव्य बजावतानाचा एक व्हिडिओ सोशल (Viral video) मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर एक व्हीडिओ शेअर करण्यात आला असून त्याखाली एक हॅशटॅग देण्यात आला आहे. #आम्ही ड्युटीवर आहोत असा हा हॅशटॅग आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात रस्त्यावरून जखमी वडिल आणि मुलगी जात होते. गुडघ्याभर साचलेल्या पावसातून मुंबई पोलिसांनी बाप-लेकीला बाहेर पडण्यास मदत केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

कांदिवलीमधील (Kandivali) हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. मात्र नेमका परिसर कोणता ? आणि काय घडलं आहे ? याबाबत माहिती मिळालेली नाही. पण भर पावसात मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबई पोलीस कार्यरत असल्याच या व्हिडीओतून अधोरेखित होत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर (Palghar) आणि रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title : Mumbai Police | big salute mumbai police helped injured father daughter

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !

Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर,
संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

pandharpur ashadhi ekadashi 2021 update :
महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

Instant Sugar Control | इन्स्टंट शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज इतक्या प्रमाणात प्या भेंडीचे पाणी