महिलांसाठी खुशखबर ! संकटातील स्त्रियांना जवान घरापर्यंत सोडणार, फक्त एक कॉल करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कामाच्या व्यापामुळे महिलांना रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते. कामावरून रात्री उशीरा घरी जाताना त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांकडून वेगवेळ्या उपाययोजना राबवल्या जातात. नागपूरनंतर आता मुंबईत रात्री उशीरापर्यंत काम करणाऱ्या महिलासाठी पोलिसांकडून एक खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागपूर पोलिसांनी रात्री उशिरा जाणाऱ्या महिलांनी मदत मागितल्यास त्यांना घरी सोडण्यासाठी तातडीने होम ड्रॉपची सुविधास सुरु केली आहे.

नागपूर प्रमाणेच मुंबई पोलिसांकडून हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे पोलीस दलाच्या तुकडीकडून आरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत. अडचणीत असलेल्या महिलेने मदत मागितल्यास किंवा फोन केला तर आरपीएफ जवान अडचणीत सापडलेल्या महिलेच्या मदतीसाठी तात्काळ त्या ठिकाणी हजर राहणार आहेत. तसेच त्या महिलेला घरापर्यंत सोडण्यासाठी तिच्यासोबत एक आरपीएफ जवान महिलेच्या घरापर्यंत जाणार आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने ही योजना आखली आहे.

रेल्वे कडून हेल्पलाईन नंबर
अडचणीत असलेल्या महिलांना तात्काळ मदत मिळावी यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने योजना आखली आहे. आरपीएफचे जवान महिलांना घरापर्य़ंत सुरक्षित पोहोचवणार असल्याची माहिती मिळत आहे. या योजनेंतर्गत रेल्वेकडून 182 क्रमांक जारी करण्यात आला आहे. महिलांना ही सुविधा रात्री 12 ते सकाळी 6 पर्य़ंत मिळणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी या क्रमांकावर कॉल करून महिला जवानांची मदत घेऊ शकतात.

हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा
महिला प्रवासात एकटी असेल आणि तिला असुरक्षित वाटत असेल तर तिने रेल्वेच्या 182 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर तातडीने आरपीएफ जवान किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी पाठवण्यात येतील. त्यानंतर सदर महिलेला हे जवान किंवा कर्मचारी सुरक्षित स्थळापर्यंत अथवा महिलेच्या मागणीनुसार तिला घरापर्यंत पोहचवतील अशी माहिती मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –