अभिनेता अजय देवगणच्या ‘त्या’ ट्विटला मुंबई पोलिसांचं ‘उत्तर’ ! इंटनेटवर ‘बोलबाला’

पोलीसनामा ऑनलाईन :देशाला आणि राज्याला कोरोनाच्या संकटातून वाचवण्यासाठी डॉक्टर्स, पोलीस प्रशासन न थांबता काम करत आहेत. एकीकडे डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून पूर्ण वेळ कोरोनाग्रस्तांसाठी झटत आहेत. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनदेखील सुट्टी न घेता काम करताना दिसत आहे. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी तेही खूप मेहनत घेत आहेत. अलीकडेच मुंबई पोलीस आणि अजय देवगण यांच्यात ट्विटरवर काही बातचित झाली, ज्यांना पूर्ण इंटरनेटचं मन जिंकलं आहे. हे संभाषण लोकांना खूप आवडताना दिसत आहे.

मुंबई पोलिसांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी लोकांना विचारलं की, 21 दिवस लॉकडाऊनमध्ये ते घरात बोर झाले आहेत का ? जर झाला असाल तर चला त्या पोलिसांशी बोलूयात जे न थकता सतत काम करत आहेत. जर त्यांना 21 दिवस घरात बंद केलं तर ते काय करतील. अधिकाधिक पोलिसांनी हेच सांगितलं की, त्यांची नोकरीच अशी आहे की, त्यांना घरच्यांना द्यायला वेळच मिळत नाही. अशात ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतील. काही म्हणाले ते पुस्तकं वाचतील, मुलांसोबत खेळतील, सिनेमा पाहतील.”

अजय देवगणला हा व्हिडीओ खूपच आवडला. त्यानं व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, मुंबई पोलीस कोरोनाशी युद्ध करत आहे. मुंबई पोलिसांनी अजयच्या या ट्विटला उत्तर दिलं की, डिअर सिंघम, आम्ही फक्त ते करत आहोत जे करण्याची खाकीकडून अपेक्षा केली जाते. जेणेकरून सर्व काही पहिल्यासारखं होईल. Once Upon a Time in Mumbai. लोकांना मुंबई पोलिसांचं हे ट्विट खूपच आवडलं आहे.

सोशल मीडियावर हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. अनेक लोक याला शेअर करत आहेत. काहींना परिस्थितीचं गांभीर्य नसल्यानं ते अजूनही घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत.