Mumbai Police | मुंबई पोलिसांचा दाऊद इब्राहिमला दणका, गँगस्टर रियाझ भाटीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police | कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) निकटवर्तीय आणि गँगस्टर रियाझ भाटीला (Gangster Riaz Bhati) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने अंधेरीतून अटक (Arrest) केली आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी (Extortion) आणि जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova Police Station) छोटा शकीलचा (Chota Shakeel) साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट (Salim Qureshi alias Salim Fruit) आणि रियाझ भाटी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. रियाझ भाटी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police )
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाकडून (Anti Extortion Cell) केला जात होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी आणि छोटा शकील याचे नातेवाईक सलीम फ्रूट यांनी अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी कार आणि सात लाखांहून अधिक रुपये उकळले होते.
व्यावसायिकाने जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या एईसी पथकाला रियाझ भाटी अंधेरी येथे एका ठिकाणी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून भाटीला अंधेरी परिसरातून अटक केली.
गुन्हे शाखेने सलीम फ्रूटीची एनआयए विशेष न्यायालयात (NIA Special Court) याचिका दाखल केली आहे.
आज आरोपी भाटी याला पोलीस न्यायालयात हजर करणार असून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे.

Web Title :- Mumbai Police | riyaz bhati aide of dawood ibrahims arrests by mumbai crime branch for extortion case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Raw Food Side Effects | ‘हे’ 5 हेल्दी फूड्स चुकूनही कच्चे खाऊ नका, होऊ शकते गंभीर नुकसान!

Joint Pain | नवजीवन वेदनाहर तेल व चुर्ण सांधेदुखीवर रामबाण उपाय, एकदा वापरा सांधेदुखीला करा कायमचा राम राम

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो का?, ज्यांना पाहिलं नाही, ज्यांनी…, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर भाजपा, ब्राह्मण संघटनांचा आक्षेप