खुशखबर ! मुंबई – पुणे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून या मार्गावरील रेल्वेसेवा आजपासून पूर्ववत होत आहे. मागील अनेक दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे ही सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन बंद पडली होती. त्यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या आजपासून सुरु होणार असून या सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

या मार्गावर धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या रविवारपर्यंत सुरळीतपणे धावणार असून यामध्ये इंटरसिटी एक्स्प्रेसचा देखील समावेश असणार आहे. मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. यामुळे हा मार्ग गेले अनेक दिवस बंद करण्यात आला होता. त्यामुळे हा मार्ग दुरुस्त करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतले होते. या दुरुस्तीमुळे अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले होते.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस देखील कमी पडू लागल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त-