‘भाईजान’ सलमानचा बॉडीगार्ड ‘शेरा’नं केला शिवसेनेत प्रवेश, चढला राजकारणाची पहिली ‘पायरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सलमान खानचा बॉडिगार्ड शेरा याने काल शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थितीत होते. याविषयीची माहिती शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

ट्विटरवर शिवसेनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘अभिनेते सलमान खान यांचे निष्ठावंत व विश्वासू गुरमीत सिंग उर्फ शेरा जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.’

सलमान खानचा जवळचा आणि अंत्यत विश्वासू म्हणून शेराची ओळख आहे. मागील 20 वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम करत आहे शेराचे खरे नाव गुरमीतसिंग जॉली आहे.

21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुका लढवत आहेत. 124 जागांसाठी शिवसेना आणि उर्वरित 164 जागांसाठी भाजप आणि मित्रपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी येईल. महाराष्ट्रात सुमारे 8.64 कोटी मतदार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी