अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची बहिण फहमीदाचे मुंबईत निधन

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलची धाकटी बहिण फहमीदाचे निधन झाले आहे. फहमीदाचे निधन मुंबईत झाले आहे. छोटा शकीलनुसार, फहमीदाचा मृत्यू हार्टअटॅकने झाला आहे. छोटा शकील आणि अंडरवर्ल्डच्या सूत्रांनी सांगितले की, फहमीदा आरिफ शेख उर्फ आपाचे बुधवारी दुपारी 3 वाजता निधन झाले.

फहमीदा 50 वर्षांची होती. छोटा शकीलची बहिण आणि तिचे कुटुंब मुंबईतील मीरारोड येथे राहतात. फहमीदाचा पती आरिफ शेख प्रॉपर्टीचे काम करतो. छोटा शकीलचे म्हणणे आहे की, मृत्यूचे खरे कारण मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. छोटा शकीलने मुंबईत आरिफ आणि कुटुंबियांशी बातचीत केली. फहमीदाचा मृत्यू मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये झाला. प्रोटोकॉलनुसार पोस्टमॉर्टमदरम्यान कोरोनाची टेस्टसुद्धा होऊ शकते. छोटा शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा प्रमुख साथीदार मानला जातो. तो सध्या पाकिस्तानात लपला आहे.

फहमीदा प्रथम दुबईत राहात होती. 2006 मध्ये ती मुंबईत शिफ्ट झाली होती. अंडरवर्ल्डच्या सूत्रांनी सांगितले की, फहमीदा छोटा शकीलची सर्वात लाडकी बहिण होती. ती चार बहिण-भावांमध्ये सर्वात लहान होती. 2011 मध्ये शकीलचे वडील बाबुमिया शेख यांचे वयाच्या 83 व्या वर्षी जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यावेळी हे कुटुंंब दक्षिण मुंबईतील टँकर मोहल्ला परिसरात इस्माईल बिल्डिंगमध्ये राहात होते.