सांगलीत भावजीचा निर्घृण खून, मेहुणे पसार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – कौटुंबिक वादातून संगलीमध्ये एकाचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मेहुणे पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मेहुण्यांनीच भावजीचा का खून केला याची परिसरच चर्चा होत आहे.

जमीर रफिक पठाण ( वय ५५, रा. पेन, पनवेल, जि. रायगड) असे खून झालेल्याचे नाव आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली आहे. याप्रकरणी आलीम सलीम पठाण व त्याचा भाऊ शाहरुख (रा. शंभरफुटी रस्ता, पाकिजा मस्जिदजवळ, सांगली) यांच्यावर संशय आहे. मृत पठाण हे संशयितांचे भाऊजी आहेत.

सोमवारी ते सांगलीत आले होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. यातून त्यांचा खून झाल्याचा संशय आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नेमका काय घरगुती वाद होता याबाबत तपास चालू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय 

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज 

Loading...
You might also like