बारामती येथील प्रसिद्ध बिल्डरचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन 

येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादासाहेब साळुंके यांचा डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उजनी धरणाच्या खालील बाजूस सोलापूर -पुणे महामार्गावरील पुलाखाली त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87eff3fa-cea7-11e8-b74e-15eb21e460c5′]

याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गावाच्या पोलीस पाटील याने पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता डोक्यात दगड घालून खून केल्याचे दिसून आले. या व्यक्तीच्या अंगात पांढरा शर्ट व निळी जीन्स पॅन्ट घातलेली होती. शर्टवर बारामती येथील सिकवेरा टेलर्स, बारामती, असा टेलर मार्क होता. त्यावरुन पोलिसांनी टेलर्सकडे जाऊन चौकशी केली. अंगावरील कपडे, फोटो दाखविल्यावर दादासाहेब साळुंके यांचा तो मृतदेह असल्याची ओळख पटली. त्यांच्या नातेवाईकांनीही तो ओळखला.

[amazon_link asins=’B00HLY67N2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3a3f580-cea8-11e8-82f6-2b369414805d’]

दादासाहेब साळुंखे (वय ३५, रा. बारामती) यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांच्या घरातील लोकांनी सांगितले की, ११ आॅक्टोंबरला ते सायंकाळी ७ वाजता आपल्या स्वीफ्ट कारमधून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी आले नाही. त्यांचा काहीही संपर्क होऊ शकला नव्हता. जेथे दादासाहेब साळुंके यांचा मृतदेह आढळून आला. त्या घटनास्थळावर वाहनाच्या टायरचे मार्क दिसून आले असले तरी जवळपास कोठेही साळुंके यांची कार आढळून आली नाही.

राजकीय महिलेवर अश्लिल टिका करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री साळुंके यांचे नातेवाईक टेंभुर्णीला गेले होते. आज सकाळी पोलिसांनी दादासाहेब साळुंके यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. साळुंके हे तेथे कसे आले. त्यांचे अपहरण झाले का, त्यांची कार कोणी नेली अथवा त्यांचा खून करण्यामागील नेमके कारण काय याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अधिक तपास टेंभुर्णी पोलीस करीत आहेत.