धक्कादायक ! ‘कोरोना’बाधित असल्याच्या संशायावरुन वडिलांनी केली मुलाची हत्या

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. कोरोनासदृश्य असल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन कराव लागला आहे. तर काही ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित असल्याचा संशय आल्यामुळे वडिलांनी मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सिकंदराबाद येथून इतर मजुरांसोबत आलेला मुलगा कोरोना बाधित असल्याच्या संशयावरून वडिलाने त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी गोंदिया शेजारील बालाघाट जिल्ह्यातील गडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कुगांव येथे घडली. सिकंदराबाद येथून पायपीट करीत दोन दिवसांपूर्वीच मुलगा गावी पोहोचला होता. या प्रकरणाची माहिती कळताच गडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कमलेश शाहू यांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.