अहमदनगर : तलवारीने हल्ला करून युवकाच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पारनेर शहरात युवकावर तलवारीने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मते यांनी कालच आंबेडकर चौकात नवीन चहाची टपरी सुरू केली होती. आज मते हे चहाची टपरी उघडण्यासाठी आले असता शहरातीलच रहिवाशी असलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास अचानक तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात तलवारीचा वार चुकविताना मते यांच्या उजव्या हाताच्या पंजाला गंभीर जखम झाली. तसेच दुसऱ्या हाताला,
डोक्याला व पायालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले.

जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेले आहे. या घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरविली आहेत. हा हल्ला नेमका कशासाठी झाला व कोणी केला, याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते.

मते यांचे शहरातीलच एका कुटुंबाबरोबर वाद आहेत. त्यातून ही हाणामारी झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे मते यांच्यावरील हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात समजले.

संशयावरूनच पोलिसांनी एकास ताब्यातही घेतले आहे. त्याच्याकडे चौकशी सरू आहे. तसेच इतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहे. त्यासाठी काही पथके तयार करून ते जिल्ह्यातील काही भागात तपासासाठी पाठविण्यात आलेली आहेत.

Visit : Policenama.com