‘महानायक’ अमिताभ यांना किती दिवस रुग्णालयात ठेवणार ? अभिषेकनं दिली ‘ही’ माहिती

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बच्चन कुटुंबात चौघांना करोनाची लागण झाली आहे. अभिषेक, ऐश्वर्या आणि नात आराध्या या तिघांच्याही चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

अभिषेक बच्चनवरही नानावटीमध्ये उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या मात्र घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. अमिताभ यांना नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार? असा त्यांच्या चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. मी आणि माझे वडिल किती दिवस रुग्णालयात राहणार ते सर्व डॉक्टरांवर अवलंबून आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी, कृपा करुन नियमांचे पालन करा असे अभिषेकने ट्विटमध्ये म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे, असे नानावटी रुग्णालयाकडून माहिती मिळाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like