‘त्या’ हत्याकांडाचं गूढ येणार समोर; पैलवान सुशील कुमारच्या निकटवर्तीयाने केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील छत्रसाल स्टेडियमवर ५ मे रोजी झालेल्या भांडणामध्ये हरियाणाचा पैलवान सागर धनकड़ (वय, २३) याची हत्या झाली. त्यावेळी सागरचा रुग्णालयातच मृत्यू झाला. तर ऑलम्पिक पदक विजेता सुशील कुमार अजूनही फरार आहे. सागर धनकड़ हत्याप्रकरणी सुशील कुमारचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार याच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस बजावली. आता मात्र मंगळवारी पोलिसांनी सुशील कुमारचा निकटवर्गीय असणारा भुरा मल्लाची चौकशी केली. तर या भुराने सुशील कुमार बाबत एक धक्कादायक खुलासा पोलिसांसमोर केला आहे.

अधिक माहितीनुसार, पोलिसांनी भुरा मल्लाची कसून चौकशी केल्यावर त्याच्याकडून एक मोठा आणि धक्कादायक खुलासा पुढं आला आहे. मुख्य आरोपी असलेला सुशील कुमारने भुराला भांडण झाल्याचं कळवलं होत. त्यावेळी भुरा तेथे घटनास्थळी आला तेव्हा सागरचा अगोदरच मृत्यू झाला होता. त्यानंतर हरिद्वारला सोडण्यास भुराला सांगण्यात आलं. पोलिसांनी आरोपींकडून ४ कार आणि काही सामान ताब्यात घेतले आहे. तसेच, या हत्या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस हरिद्वारला जाऊन करणार आहेत तिथे पोलिसांना सुशील कुमारचे शेवटचचे लोकेशन मिळाले होते. दिल्ली पोलिसांना सुशील आणि त्याच्या साथीदारांचा १ आठवड्यानंतरही त्याचा सुगावा लागला नाही. या प्रकरणी पोलिसांचे पथक ५ राज्यामध्ये त्याचा शोध घेत आहेत. सुशील कुमारसह पोलिसांनी त्या दिवशी उपस्थित १७ जणांची यादी तयार केली आहे. त्यानुसार पैलवानांचा शोध सुरु आहे.

या दरम्यान, ५ मे रोजी भांडणा वेळी सागर आणि त्याचे ४ मित्र गंभीर जखमी झाले. यात सुशीलसह अनेक जण आरोपी आहेत. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आणखी काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सुशील कुमार अद्यापही फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दरम्यान, सुशील कुमार म्हणतो की, ते आमचे पैलवान नव्हते, मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की, काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या परिसरात शिरकाव करीत भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले होते.