800 वर्ष जुन्या ‘रामप्पा’ मंदिराचे आश्चर्यकारक ‘रहस्य’, आजपर्यंत शास्त्रज्ञ देखील समजू शकले नाहीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मंदिरांचे नाव त्यामध्ये विराजमान असणाऱ्या देवतांच्या नावाने ठेवली जातात, परंतु भारतात असे देखील एक मंदिर आहे, ज्याचे नाव त्या मंदिराला बनवणाऱ्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे, असे मानले जाते की असे वैशिष्ट्य असणारे कदाचित जगातील हे एकमेव मंदिर असेल. हे रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते, ते तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील वेंकटापूर विभागातील पालमपेट गावात एका दरीमध्ये वसलेले आहे. पालमपेट हे एक छोटेसे गाव असले, तरी शेकडो वर्षांपासून त्याचे वास्तव्य आहे.

रामप्पा मंदिरात भगवान शिव विराजमान आहेत, म्हणूनच याला ‘रामलिंगेश्वर मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराच्या बांधणीची कहाणी अत्यंत रंजक आहे. असे म्हटले जाते की इ.स. 1213 मध्ये आंध्र प्रदेशातील काकतिया घराण्याचे महाराजा गणपती देव यांच्या मनात अचानक शिव मंदिर बांधण्याची कल्पना आली. यानंतर, त्यांनी आपले शिल्पकार रामप्पाला आदेश दिले की असे मंदिर बनवा जे वर्षानुवर्षे टिकून राहील.

रामप्पानेही आपल्या राजाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्याच्या कारागिरीने एक भव्य, सुंदर आणि विशाल मंदिर बांधले. असे म्हटले जाते की ते मंदिर पाहून राजाला इतका आनंद झाला की त्याने त्या शिल्पकाराच्या नावावर या मंदिराचे नाव ठेवले. 13 व्या शतकात भारतात आलेले इटालियन प्रसिद्ध व्यापारी आणि शोधकर्ता मार्को पोलो यांनी या मंदिराला ‘मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात उज्ज्वल तारा’ असे संबोधले.

800 वर्षांनंतरही हे मंदिर पूर्वीइतकेच मजबुतीने उभे आहे. काही वर्षांपूर्वी अचानक लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की हे मंदिर इतके जुने आहे, तरीही ते का कोसळत नाही, त्या नंतरची बांधलेली बरीच मंदिरे ही मोडकळीस येऊन पडली आहेत. पुरातत्व खात्यापर्यंत जेव्हा ही बाब पोहोचली तेव्हा ते मंदिराची तपासणी करण्यासाठी पालमपेट गावात पोहोचले. बरेच प्रयत्न करूनही ते या रहस्याचा तपास करू शकले नाहीत की आजपर्यंत हे मंदिर इतक्या मजबुतीने कसे उभे आहे.

नंतर, पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी मंदिराच्या सामर्थ्याचे रहस्य शोधण्यासाठी तेथून दगडाचा एक तुकडा कापला, त्यानंतर आश्चर्यचकित करून सोडणारे सत्य समोर आले. वास्तविक तो दगड खूप हलका होता आणि जेव्हा त्या दगडास पाण्यात टाकले गेले, तेव्हा तो पाण्यात बुडण्याऐवजी पोहायला लागला. तेव्हा कुठे मंदिराच्या सामर्थ्याचे रहस्य कळाले की जवळजवळ सर्व पुरातन मंदिरे त्यांच्या जड दगडांच्या वजनामुळे मोडकळीस निघाले आहेत, परंतु या मंदिरात वापरण्यात आलेला दगड हा अतिशय हलका आहे, त्यामुळे हे मंदिर अजूनही जसेच्या तसे आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न असा होता की असे हलके दगड कोठून आले, कारण असे दगड जगात कुठेही सापडत नाहीत, जे पाण्यामध्ये तरंगू शकतात (राम सेतुच्या दगडांना सोडून). तेव्हा प्रश्न पडला की रामप्पाने स्वत: हे दगड तयार केले असतील का आणि तेही 800 वर्षांपूर्वी? पाण्यामध्ये तरंगतील इतके दगड हलके करणारे असे कोणतेही तंत्र त्यांच्याकडे तेव्हा उपलब्ध होते का? हे सर्व प्रश्न आजही एक प्रश्नच बनून राहिले आहेत, कारण आजपर्यंत कोणालाही त्यांचे रहस्य माहित नाही.