अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील कोठडीतून आरोपी पळाला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – गांजाची तस्करी केल्याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी पकडलेल्या आरोपीने आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील कोठडीतून पोलीसांना गुंगारा देत तो पसार झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड, सावेडी) असे
पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, कोतवाली पोलीसांनी तीन दिवसापूर्वी नगर-पुणे महामार्गावर केडगाव बायपास येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला होता. यातील सागर धनापुरे हा एक आरोपी होता.

दोन दिवसापासून सागरच्या पोटाचा त्रास होत असल्याने रविवारी रात्री कोतवाली पोलीसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. आज सकाळी तो पोलिसांना गुंगारा देऊन तो पसार झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/