नालासोपारा स्फोटकं प्रकरण, आरोपींकडून सनबर्नमध्ये घातपाताचा कट 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

नालासोपारा स्फोटकं प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत असून, अटकेत असलेल्या आरोपींकडून पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती एटीएसने दिली आहे. आज (मंगळवार) सेशन्स कोर्टातील सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ही खळबळजनक माहिती दिली आहे.

अटकेत असलेल्या आरोपी पैकी शरद कळसकर, सुधन्वा गाेंधळेकर यांच्याकडून हा कट रचला जात होता, असं एटीएसने कोर्टात सांगितलं आहे. एवढेच नाहीतर जालन्यातून अटक करण्यात आलेला श्रीकांत पांगारकर हा या स्फोटासाठी पैसे पुरवणार होता, असा दावा देखील एटीएसकडून करण्यात आला आहे.
कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

एटीएसने आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि वैभव राऊतला हजर केलं होतं. कोर्टात एटीएसने या आरोपींची आणखी नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या तपासात मोठी प्रगती झाली असून विविध राज्यात चौकशी सुरु आहे. त्या ठिकाणी चौकशीसाठी आरोपींना घेऊन जायचं आहे. तसेच आरोपींना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी दिलं याची माहिती मिळाली असल्याचं एटीएसकडून कोर्टात सांगण्यात आलं आहे.