अशी ही बनवाबनवी ! शिक्षिकेनं नाव बदलून एकाच वेळी केलं 25 शाळांमध्ये ‘काम’, 13 महिन्यात केली 1 कोटीची ‘कमाई’

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाइन –  एका शिक्षिकेने एकाच वेळी २५ शाळांमध्ये काम करून १३ महिन्यामध्ये १ कोटी रुपयांचे कथित वेतन मिळवले. शिक्षकांचा डेटाबेस तयार करताना यामधील घोळ उघडकीस आला. ही शिक्षिका उत्तरप्रदेशमधील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात विज्ञान शिकवते. युपीच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीचा वास्तविक वेळेवर नजर ठेवूनही अनामिका शुक्ला नावाच्या या शिक्षिकेने हा प्रकार केला. सदरील प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

मैनपुरी येथील रहिवासी असलेली अनामिका हिने काम केलेल्या शाळांमधील रेकॉर्ड नुसार, ही शिक्षिका एका वर्षापेक्षा जास्त काळ नोकरीला आहे. शालेय शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी सांगितलं की, या शिक्षिकेची चौकशी सुरु आहे. सर्व शिक्षकांना प्रेरणा पोर्टलवर आपली उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवायची आहे. पण एक शिक्षक अनेक ठिकाणी नोंदणी कशी काय करू शकते, अशी शंका आनंद यांनी उपस्थित केली. यासंदर्भात सविस्तर चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिलं आहे. मार्चमध्ये अनामिका शुक्लाविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर याचा खुलासा झाला. त्याबाबत विजय किरण आनंद यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. लॉकडाऊनमुळे शिक्षकांच्या नोंदी आढळू शकल्या नाही. २६ मे रोजी अधिकाऱ्यांना स्मरण पत्र पाठविले आहे. शिक्षकाची माहिती बरोबर आढळल्यास कडक कार्यवाही केली जाईल, अशा इशारा त्यांनी दिला.

उत्तर प्रदेश मधील प्रयाग राज, आंबेडकर नगर, अलिगड, सहारनपूर, बागपत अशा जिल्ह्यांतील केजीबीव्ही शाळांमध्ये अनामिकाची पोस्टिंग सापडली आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने केली जाते आणि त्यांना दरमहा ३० हजार रुपये पगार दिला जातो. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कस्तुरबा गांधी शाळा आहे. या शाळांमध्ये समाजातील दुर्बल घटकांमधून आलेल्या मुलींसाठी निवासी सुविधा देखील आहेत.

अनामिका शुक्ला फेब्रुवारी पर्यंत रायबरेलीच्या केजीबीव्हीमध्ये काम करताना ही बाब उघडकीस आली होती. सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने रायबरेलीचे प्राथमिक शिक्षक अधिकारी आनंद प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जिल्ह्यांना पत्र पाठवून केजीबीव्हीमधील अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षकाची तपासणी करण्यात सांगितलं आहे. रायबरेलीत यांचे नाव त्या यादीमध्ये नसले तरी आम्ही तपासणी केली असता आम्हाला आढळले की, ती महिला आमच्या केजीबीव्हीमध्येही कार्यरत आहे. त्या शिक्षिकेला या संदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे.

संबंधित शिक्षिकेला बोलविण्यात आल्यानंतर देखील ती आली नाही, असे आनंद प्रकाश यांनी सांगितलं. त्याची कागदपत्रे वरच्या स्तरावर तपासणीसाठी पाठवली आहेत. पगारही त्वरित बंद करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like