Nameplates In Marathi | सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्येच ! बार, वाईन शॉपला गड-किल्ला आणि महान व्यक्तींची नावं नाही देता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nameplates In Marathi | राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतला होता. आता याबाबत कायदा (Law) आला असून यापुढे महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानासमोर मराठी भाषेतील नामफलक (Nameplates In Marathi) असणं गरजेचं आहे. मात्र मद्याच्या दुकानांना (Wine Shops In Maharashtra) महान व्यक्तींची आणि गड किल्ल्यांची नावं (Names of Forts) देता येणार नाहीत.

 

ज्या दुकानांमधून मद्य (Alcohol) पुरवलं जातं म्हणजेच वाईन शॉप आणि बार (Wine Shops & Bars) चालकांना नामफलकावर (Nameplates In Marathi) किंवा दुकानांच्या आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची आणि गड किल्ल्यांची नावं लिहिता येणार नाही. दोन्ही सभागृहात मान्य झाले असून, या नवीन अधिनियमास 16 मार्च 2022 रोजी राज्यपालांनी (Governor) संमती दिली असल्याने, 17 मार्च 2022 पासून हा अधिनियम लागू करण्यात आला आहे.

 

नामफलकावरील मराठी अक्षराचा आकार हा इतर कोणत्याही फॉन्टपेक्षी (Font) कमी नसावा. त्यासोबतच मराठी भाषेतील अक्षरलेखन हे सुरूवातीलाच येणं गरजेचं आहे, अशी तरतुद या अधिनियमात केली आहे. त्यासोबतच सर्व कार्यालयामध्ये कामकाजाची भाषा ही मराठी होणार असून सरकारी, महापालिका कार्यालयामध्येही मराठी भाषा (Marathi language) ही कामकाजाची भाषा होणार आहे.

 

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला होता.
मात्र त्यानंतर आधीपासूनच या मागणीसाठी अग्रेसर असलेल्या मनसेने (MNS) त्यांना इशारा दिला होता.
पाट्यांच्या खर्च जास्त की काचांचा?, असं म्हणत मनसेने सूचक इशारा दिला होता.

 

 

Web Title :- Nameplates In Marathi | wine shop banned from naming great people forts maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

 

Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

 

Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना