लोकसभा निवडणूकीबाबत नाना पाटेकरांनी केला ‘हा’ खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहेत. अनेक कलाकार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे तर कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर नाना पाटेकरांचे नाव सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे.

मात्र, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खुद्द नाना पाटेकरनेच खुलासा केला आहे.नानाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करत मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे नाना लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांवर आता पुर्णविराम लागला आहे.

नाना म्हणाला की, ‘नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीं. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही.

‘सध्या नाना पाटेकराच्या नावाने अनेक फेक फेसबुक पेजेस तसेच ट्विटर खाती असून त्याच्यामार्फत अनेक वावड्या उठवल्या जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना पाटेकर आता लोकसभा निवडणूक लढवणार असून त्यासदर्भातील त्याचे अनेक फोटो देखिल व्हायरल झाले होते. त्यामुळे नाना नक्की काय करणार याबाबत सभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून त्याबाबत खुलासा करत आपण कोणत्याही प्रकारच्या राजकारणात नसल्याचे म्हटले आहे.